आजचा दिवस कसा जाईल? 14 जुलै 2024 – रविवार

मेष रास

आज अपयशाचा सामना करावा लागेल. तुमची कौशल्ये आणि पावर चा उपयोग नीट करून न घेतल्यामुळे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. वडील, मोठा भाऊ, पती, यांच्याकडून त्रास होऊ शकतो; तसेच त्यांना प्रॉब्लेम्स देखील येऊ शकतात.

वृषभ रास
आज थोडा विरोध झाला की तुम्ही मागे हटू शकता. विरोधकांचा सामना करा. स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवण्यात कमी पडाल. इतरांच्या म्हणण्यानुसार काम केल्याने ते बिघडेल.

मिथुन रास
आज मनात खूप विचार येतील. अनावश्यक विचार आणि स्वप्नांमुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. दिशाहीन दिवस जाऊ शकतो. चांगले काहीतरी वाचण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला मार्ग मिळेल.

कर्क रास
आज कामात प्रगती होईल. प्रत्येक काम अगदी सहज पूर्ण होईल. आज ठरवून कामे करा. महत्वपूर्ण कामे आज करा म्हणजे अडचणीतून पूर्ण सुटका होईल आणि दिवस आनंदात जाईल.

सिंह रास
आज तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. गॉसिपिंग करण्यापासून, इतरांच्या पाठीमागे बोलण्यापासून दूर राहा. आज कशातच लक्ष लागणार नाही. आज सांभाळून दिवस घालवा.

कन्या रास
आज सर्वांपासून थोडे अंतर ठेवून वागण्याचा प्रयत्न करा. महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. एका निर्णयावर ठाम राहता येणार नाही. इतरांशी बोलून देखील मनाचे समाधान होणार नाही. आज शांत राहण्याचा प्रयत्न करा.

तुळ रास
आज कोणतेच काम करावेसे वाटणार नाही. कशातच मन लागणार नाही. थकल्यासारखे वाटेल. शक्य असतील आणि तुम्हाला जे नको वाटत आहेत अशा सगळ्या कामातून, प्रोजेक्ट मधून, इतर गोष्टींमधून बाहेर पडा.

वृश्चिक रास
आज मन लावून काम करा. एखादे काम दोन वेळा करावे लागेल. त्याच त्या कामाचा कंटाळा येण्यापेक्षा आनंद वाटेल. घराशी संबंधित काम आज मुख्यत्वे करावे लागू शकते.

धनु रास
आज जबाबदारीने वागा. कामातून मान वर काढायला वेळ मिळणार नाही. गोल्स कम्प्लीट झाल्यामुळे आनंद होईल. विनाकारण रिस्क घेतल्यास नुकसान होईल.

मकर रास
आज नशिबाची साथ मिळेल. भाग्य बदलेल. चांगल्या बातम्या कळतील. अडचणीतून मार्ग मिळेल. व्यवसायात वाढ होईल. नफा मिळेल. लाभदायक दिवस.

कुंभ रास
आज भांडणानंतरच्या शांतीचा अनुभव तुम्ही घेणार आहात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वच्छ मनाने माफी मागितल्यास अडचणी दूर होतील. एखाद्या मानसिक आणि सामाजिक प्रकारच्या अवघड वाटणाऱ्या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो.

मीन रास
आज स्वतःच्या फायद्या पुरता इतरांचा वापर तुम्ही करू शकता. बोलण्यात आणि वागण्यात भिन्नता असेल. कामे पूर्ण होणार नाहीत. तुमचे मॅजिक काम करणार नाही.
@Ritikaslifetherapies
रितिका
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++++