पावसासोबत वाऱ्यांचा वेगही वाढणार : खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना
अमित खोत | मालवण:
मालवणात मुसळधार पाऊस कोसळत असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोरही वाढत आहे. 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हा वेग 65 किलोमीटर प्रतितास होऊ शकतो. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील बंदर कार्यालयाना 3 नंबर वादळी बावटा लावण्याचा मेसेज प्राप्त झाला आहे. अशी माहिती बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी दिली आहे. खाडीपात्रातही मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये. स्थानिकानी सतर्क राहावे. असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (रविवार) पावसाचा रेड अलर्ट असून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












