खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खाडी पट्टा विभागातील
खेड मार्गावरील बहीरवली एक ते दोन नंबर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असल्याने वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत समोरील येणारे वाहने दिसून येत नाही त्यामुळे अचानक ब्रेक लावून लहान मोठी वाहने एकमेकांवर आदळुन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत
याबाबत संबंधित खात्याने त्वरित रस्त्यावरची झाडी मारून वाहनधारकाला होणारा अपघात टाळावा अशी मागणी बहीरवली गावचे समाजसेवक अब्दुल्लाभाई उमर चौगुले यांनी केली आहे या रस्त्यावर अनेक समस्या निर्माण झाले आहे
ह्या रस्त्यावर बांधकाम खात्याकडून गटाराची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पावसाचे संपूर्ण पाणी तुंबल्याने रस्ता दिसून येत नाही पाण्यातूनच रस्ता शोधावा लागत आहे अशी परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे या बाबीकडे प्रशासन गंभीर्याने घेत नसल्याने वाहनधारकाला मोठ्या प्रमाणात अनेक अडचणी ना समोर जावे लागत आहे याबाबत संबंधित खात्याने योग्य ती कारवाई करावी व वाहनधारकाला दिलासा द्यावा अशी मागणी अब्दुल्ला उमर चौगुले यांनी केली आहे












