बिबट्याच्या हल्ल्यात जखमी अमित जाधव यांना वन खात्यातर्फे 5 लाखांची मदत

 

पालक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देवरूखात धनादेश प्रदान

साखरपा | वार्ताहर :साखरपा येथे जून महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात अमित जाधव यांना अतिशय गंभीर दुखापत झाली होती.त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू होते. त्याच्यावर जलद व चांगले उपचार करण्यासाठी ओंकार कोलते यांनी निर्णय घेवून परकार हॉस्पिटल येथे दाखल केले त्यामुळे त्याची तब्बेत आता सुधारत आहे .

या हल्ल्याची तिव्रता गंभीर होती.
ही बाब लक्षात घेवून वनविभागाकडून जाधव यांना ५ लाखाचा धनादेश उद्योगमंञी तथा पालकमंञी उदय सामंत यांच्या हस्ते देवरुख मराठा भवन येथील मुख्यमंञी -माझी लाडकी बहिण या कार्यक्रमा दरम्यान जाधव यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार शेखर निकम, वनअधिकारी गिरीजा देसाई ,तहसीलदार सौ.अमृता साबळे ,ओंकार कोलते ,संजय सुर्वे शासकीय अधिकारी उपस्थित होते.