बागायत मुख्य मार्गांवर मोठया प्रमाणात पाणी ; वाहतूक ठप्प : जनजीवन विस्कळीत
अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या संतातधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. बागायत मुख्य मार्गांवर आजही मोठया प्रमाणात पाणी आले आहे. मार्ग ठप्प झाला आहे.
प्रवासी तसेच शाळा कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गासमोर समस्यां निर्माण झाली आहे. पाण्याने अनेक घरे, दुकानें यांना वेढा दिला आहे. शेतीतही मोठया प्रमाणात पाणी घुसले असून शेती पाण्याखाली गेली आहे.












