आजचा दिवस कसा जाईल? 15 जुलै 2024 – सोमवार

आजचा दिवस कसा जाईल?
15 जुलै 2024 – सोमवार

मेष रास
आज तुम्ही जुन्याच गोष्टीत अडकून पडाल. एखाद्या बाबतीत गरजेपेक्षा जास्त कॉम्प्रमाईज करावे लागेल. जुळवून घ्यावे लागेल. कामे होणार नाहीत आणि झालीच तर फार प्रयत्नाने होतील. भावनांवर नियंत्रण ठेवा

वृषभ रास
आज तुम्हाला मदतीची गरज असतानाच तुम्ही ती  नाकारू शकता. पैश्याची मदत द्यावी – घ्यावी लागेल. नको तिथे दान पुण्य करण्याचा मोह टाळा. एकटे राहण्याचा प्रयत्न देखील आज तुम्ही करू शकता.

मिथुन रास
आज तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये क्लॅरिटी मिळेल. काही बाबतीत स्पष्टता मिळाल्यामुळे तुमची कामे चांगली होतील. प्रवासाचे योग आहेत. मानसिक शांतता मिळेल.

कर्क रास
आज प्रेम तसेच लग्नाचे प्रपोजल मिळण्याचे योग आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहील. एकमेकांबद्दल प्रेम आणि आकर्षण वाढेल. निर्णय घेताना मनाचा कौल ऐका.

सिंह रास
आज कामात चुका होतील. गती मिळणार नाही. इच्छा आणि कर्तव्य यांची भेसळ होईल त्यामुळे निर्णय चुकतील. स्वतःबद्दल एकांतात बसून विचार करा.

कन्या रास
आज आजारपण, घरातली कामे, करिअर, ऑफिस, पैशाचे नियोजन, यामध्ये दिवस भरडला जाणार आहे. तुमच्या विचारांवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुळ रास
आज मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देताना तुमची भीती देखील कमी होत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. सतत मनात डोकावणारे विचार लिहून काढा. एखादी काळजी आज मीटेल.

वृश्चिक रास
आज संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल करा. जे तुमचे आहे हक्काचे आहे ते लढून मिळण्याचा प्रयत्न करा. स्पर्धांमध्ये भाग घेतल्यास यश मिळेल. कामात तसेच इतर ठिकाणी देखील मोकळ्या मनाने वागल्यास यश मिळेल.

धनु रास
आज तुम्हाला सगळ्यांमध्ये राहूनही एकटे पडल्यासारखे वाटेल. घर, काम, मैत्री, इत्यादी नात्यांमध्ये काही बाबतीत तुमचे पटणार नाही. म्हणावा तसा सपोर्ट कुठूनच मिळणार नाही. थकल्यासारखे वाटेल.

मकर रास
आज तुम्ही माणूस आहात आणि तुम्हाला चांगल्या वाईट अपेक्षा असू शकतात हे मान्य करा. कुत्रे, मांजर, तसेच इतर प्राण्यांपासून लांब राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. हा विश्वासच तुम्हाला यश मिळवून देईल.

कुंभ रास
आज निराशेचा सामना करावा लागेल. अति सुख, खाणे, पिणे, मौजमजा, या सगळ्याचा अतिरेक होऊ शकतो. आनंद “वाटण्यात” आणि समाधान “मानण्यात” असते हे लक्षात ठेवा. नको त्या कामात गुंतण्याची शक्यता आहे.

मीन रास
आज प्रत्येक बाबतीत कमतरता जाणवेल. बजेटच्या बाहेर जाऊन खर्च करू शकता. “जे आहे ते कमीच आहे” असे वाटेल. काही ठिकाणी तुम्हाला स्वतः काम करण्याची गरज पडेल.

@Ritikaslifetherapies
रितिका
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++