जि. प. शाळा शीळ नं. येथे विज्ञान कक्षाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक दृष्टिकोन जोपासला पाहिजे-मधुकर पवार

राजापूर (वार्ताहर): सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. अशा वेळी ग्रामिण भागातील मुलांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा विज्ञान कक्ष सुरू करण्यात आला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला विज्ञान विषयक दृष्टीकोन जोपासला पाहिजे. यातूनच मुलांमध्ये विज्ञान विषयक जाणीव जागृती वाढून भविष्यात वैज्ञानिक निर्माण होतील असे प्रतिपादन लांजा-राजापूर-संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार यांनी शहरानजीकच्या शीळ केले.
लांजा-राजापूर-संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचे वतीने जि. प. शाळा शीळ नं. १ येथे कै. मोहन गोपाळ अरवंदेकर ‘विज्ञान कक्ष’ उभारण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 


या प्रसंगी व्यासपीठावर शीळ गावचे सरपंच अशोक पेडणेकर, माजी सरपंच तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, पोलिस पाटील सौ. दुर्वा पेडणेकर, मुख्याध्यापक सुरेश पवार, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. अंकिता बाईत, सदस्य नामदेव नागरेकर, राजेन्द्र बाईत, शिवाजी नगर मंडळाचे अरविंद मोंडे यांसह लांजा- उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम मिरगूले, चिटणीस प्रशांत साळुंके, शंकर सुर्वे, संघटक तुकाराम साळुंके, रेश्मा साळुंके, विशाखा चव्हाण, रवींद्र शिंदे, श्री. बाईत आदी उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून कै. समीर इलेव्हन शिवाजीनगर मंडळाचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर विज्ञान कक्षासाठी दहा शास्त्रज्ञांचे फोटो भेट देण्यात आले. तसेच कै. गोविंद राम गोंडाळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबियांकडून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासामध्ये प्रगीत साधावी आपली गुणवत्ता वाढवावी असे आवाहन मुख्याध्यापक श्री. पवार, व व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. बाईत यांनी केले.

 

तर दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य भेट देणाऱ्या लांजा-राजापूर-संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाने विज्ञान कक्षासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मोंडे यांनी मंडळाला धन्यवाद दिले. या विज्ञान कक्षाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून नव नविन प्रयोग करावेत, आपली विज्ञान विषयक जाणीव अधीक समृध्द करावी असे आवाहन केले. तर शिवाजी नगर मंडळ आणि कै. गो. रा. गोंडाळ कुटुंबियांना शैक्षणिक साहित्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक उदय सावंत यांनी केले.
यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य कृष्णा गोंडाळ, सौ. देवयानी पेन्ढारी, सौ. जाधव, सौ. विशाखा भोवड, निलेश गोंडाळ, अंगणवाडी सेविका सौ. प्रतिक्षा गोंडाळ, सौ. वैशाली गोंडाळ, विराज भोवड, प्रथमेश भोवड, शिक्षक सौ. जयश्री नाईक, अनिल बाणे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.