अंगणवाडी सेविकांचे बेमुदत असहकार आंदाेलनाला प्रारंभ; कुपोषित बालकांकडे होणार दुर्लक्ष

ठाणे : महिला व बालविकास विभाग व राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनामध्ये जिल्ह्यासह राज्यभरात तब्बल दाेन लाख अंगणवाडी सेविका सक्रीय कार्यरत आहेत. पण महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे त्याविराेधात या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व प्रक्षोभ खदखदत आहे. सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी साेमवारपासून बेमुदत असहकार आंदाेलन हाती घेतले आहे. त्यामुळे ऐन पावाळ्यात कुपाेषीत बालकांसह मातांच्या पुरक पाेषण आहारावर, आराेग्याच्या संदर्भ सेवा, आराेग्य तपासणीच्या कामांवर विपरीत परिणाम हाेणार आहे.

…त्यामुळे ऐन पावाळ्यात कुपाेषीत बालकांसह मातांच्या पुरक पाेषण आहारावर, आराेग्याच्या संदर्भ सेवा, आराेग्य तपासणीच्या कामांवर विपरीत परिणाम हाेणार आहे.