पेंडूर ग्रामीण रुग्णालय इमारतीची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली पाहाणी

 

रुग्णांना कोणतीही समस्यां निर्माण होता नये त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा प्रशासनास सूचना

मालवण | प्रतिनिधी : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीस अनेक ठिकाणी गळती लागली आहे. रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी रुग्णालयास भेट देत पाहाणी केली.

यावेळी रुग्णालय प्रशासन तसेच उपस्थित यांच्याकडून पालकमंत्री यांनी समस्यां जाणून घेतल्या. गोरगरिब जनतेचे हे रुग्णालय आहे. रुग्णांना कोणतीही समस्यां निर्माण होता नये या दृष्टीने उपाययोजना करा. अश्या सूचना पालकमंत्री यांनी रुग्णालय प्रशासनास दिल्या. तसेच रुग्णालयास आवश्यक असलेला निधी उपलब्ध केला जाईल असेही पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी सरपंच सतीश वाईरकर, मनसे उपाजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर, भाई सावत, मालवण माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सचिन आंबेरकर, पेंडूर खरारे उपसरपंच सुमित सावंत, अभय वाईरकर, अजित सावंत, रोहित वाईरकर, सिद्धेश परब, कुणाल माळवदे, अनिल चव्हाण, पिंट्या वालावलकर यांसह अन्य उपस्थित होते.