Sunday Lecture on Monsoon by Science Broadcaster Mayuresh Prabhune on 23rd April
‘स्काय अँन्ड अर्थ’ या पर्यावरण जागृती संस्थेचा उपक्रम
रत्नागिरी : भारतीय उपखंडासाठी एक विलक्षण वैज्ञानिक उपकारक बाब म्हणजे मान्सून. या मान्सूनमुळेच आपल्या या भागात धन – धान्य, अर्थ व्यवस्था, निसर्ग संपदा विकसित झाली आहे. मान्सूनचं दरवर्षीचं आगमन आपणास सुखावून जातं. म्हणूनच नेहमीच येणा-या मान्सूनबद्दल आपल्याला कायमच कुतूहल वाटतं. Sky n Earth व्यासपीठ आणि श्रीमती विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर विषयावर संशोधक व विज्ञान प्रसारक श्री मयुरेश प्रभुणे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. श्री मयुरेश प्रभुणे हे Citizen Science Forum, पुणे या विज्ञान चळवळीचे संस्थापक सदस्य आहेत व मेघदूत प्रकल्प या द्वारे भारतीय उपखंडातील मान्सूनचा विशेष अभ्यास त्यांनी केला आहे. वृत्तपत्रात विज्ञान विषयक विपुल लेखन तसेच दूरचित्रवाणीवर चर्चेत ते नेहमीच सहभागी असतात. त्यांचा कार्यक्रम रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीमती विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय , शिवाजी स्टेडियमच्या मागे, मारूती मंदिर, रत्नागिरी येथे समस्त रत्नागिरीकरांकरीता आयोजित केला आहे. रत्नागिरीतील विज्ञानप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने डॉ. किशोर सुखटणकर आणि डॉ एन एस कुळकर्णी यांनी केले आहे











