लांजा (प्रतिनिधी) एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था रत्नागिरीचे संचालक आणि लांजा एसटी आगारातील चालक राजेंद्र पाटोळे हे खात्यांतर्गत सहाय्यक वाहतूक निरीक्षक ही परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. लवकरच ते आपल्या पदावर रुजू होणार आहेत.
राजेंद्र पाटोळे हे गेली अनेक वर्षे लांजा एसटी आगारात चालक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ते गेले १८ ते १९ वर्षे सचिव म्हणून कार्यरत होते . संघटनेची एक धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आपल्या सर्व सभासदांच्या हितासाठी झटणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कर्मचारी वर्गात ते लोकप्रिय आहेत आणि म्हणूनच यापूर्वी झालेल्या एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था रत्नागिरी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजेंद्र पाटोळे हे संचालक पदी निवडून आले होते .
राजेंद्र पाटोळे यांनी नुकतीच सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत. लवकरच ते सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर रुजू होणार आहेत. या निवडी बद्दल राजेंद्र पाटोळे त्यांचे तालुक्याच्या सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.











