दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील वेरवली गावचा सुपुत्र निलेश कुळये हा दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून या बद्दल त्याचा लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील नीलेश नंदकिशोर कुळ्ये याची निवड झाली आहे. ही निवड अथलांटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केली आहे.
निलेश कुळये सध्या श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक या प्रशाळेवर क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. अथेलेंटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अल्ट्रा आणि ट्रायल रनिंग सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष नागराज आदीया व सेक्रेटरी रवींद्र चौधरी यांनी निवड केली असून तसे पत्र कुळये याला प्राप्त झाले आहे. ही दक्षिण कोरिया येथील उलजूगुन उल्लसान या शहरामध्ये 23 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत या आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धा संपन्न होणार आहेत.
स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निलेश कुळये याची निवड झाली आहे. त्याने लांजा तालुक्याचे तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन केले त्याबद्दल आज त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली वेरवली येथील घरी जावून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, खजिनदार संजय खानविलकर, युवक क्षेत्राध्यक्ष राजेश झोरे, जितेंद्र खानविलकर, दिनेश गुरव, विघ्नेश गुरव, गुणवंत जाधव, म़गेश कुळ्ये तसेच कुटूंबीय उपस्थित होते











