*घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथे शाश्र्वत विकासात रासायनिक अभियंत्यांच्या भूमिका यावर परीसंवाद संपन्न*

 

 

 

चिपळूण (प्रतिनिधी):— खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टीट्यट ऑफ टेक्नालॉजीच्या रासायनिक विभागाने नुकतेच रासायनिक अभियंत्यांची शाश्र्वत विकासामधील भूमिका आणि त्याचा सामाजिक संदर्भ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद घडवून आणला.

 

या परीसंवादामध्ये मोन्टाज केमिकल्स, मुंबईचे संचालक अंकुर चतुर्वेदी, सुयोग इंडस्ट्रीज, ठाणेचे योगेश पेडणेकर, यु.आई.सी.टी, जळगावचे संचालक डा. अजय गोस्वामी, , नॅशनल युनिवर्सीटी, आमान येथील डॉ. संतोष वाळके, लिक्कशुअर हैद्राबादचे डॉ. सर्जेराव डोळताडे, आयआयटी गांधीनगर येथे पीचडी करत असलेल्या घरडाच्या माजी विद्यार्थी प्रतिक्ष सोंडकर इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला.

 

पॅनेलिस्टनी शाश्वत विकासात केमिकल इंजिनिअर्सची भूमिका यावर सखोल चर्चा केली.

शाश्वत विकास (सस्टेनेबल डेव्हलपमेंट)घडवणा-याच्या प्रक्रीयेत मानवी सवय हा महत्वपुर्ण घटक असून त्या सुधारण्याची गरज सर्वानी व्यक्त केली. रिनेवेबल इनर्जी, रिसायकलींग, रियुज या मुद्यांवर सांगोपांग उहापोह करण्यात आला.

 

 

परीसंवादाचे समन्वयक म्हणून प्रा. सोनाली जाधव यांनी तर सहसमन्वयक म्हणून प्रा. विजय सावंत यांनी काम पाहीले. घरडा इंस्टीट्युटच्या अभियांत्रीकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनिल कुलकर्णी यांनी परीसंवादामध्ये मॉडरेटर या नात्याने सहभाग नोंदवला.

 

या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्राचार्य प्रमोद पाटील, उपप्राचार्य सचिन पाटील, आणि श्री. रत्नेश सिन्हा यांचे सहकार्य लाभले.

घरडा महाविद्यालय आणि रासायनिक अभियांत्रिकी विभाग नेहमीच विद्यार्थ्यासाठी नेहमीच नाविण्यरिपुर्ण उपक्रम राबवत असतो. रासायनिक अभियांत्रिकी विभागात प्रवेशासाठी 9405732206 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहान आयोजकामार्फत करण्यात आले आहे.