खंडाळा | वार्ताहर = रत्नागिरी तालुक्यातील पन्हळी या गावी शनिवारी रात्री एकच्या सुमारास वादळी वारे व मुसळधार पाऊस पडल्याने श्री अनिल सुदाम धामणस्कर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. पन्हळी गावचे पोलीस पाटील श्री महेश महाकाळ यांच्याशी घरातल्या मंडळी संपर्क करताच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे संबंधित खात्याला संपर्क करून याची कल्पना दिली आहे . प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकारी येणार आहेत पाऊस असल्याने अडथळा निर्माण होत आहे








