गुहागर | प्रतिनिधी : निगुंडळ हनुमान मंदिर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व . वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषिदिनाचे औचित्य साधून शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते – दहिवली येथील कृषिदूतांनी वृक्षारोपण व मंदिर सुशोभिकरणाचे आयोजन केले होते . यावेळी कृषी सहाय्यक अमित शेळके म्हणाले की आपल्या जीवनात वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे . त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांचे विश्लेषण केले . त्यांनी आधुनिक शेतीचे महत्त्व सांगितले .
डॉ . ओमकार निर्मळ सर त्यांच्या वक्तव्यातून म्हणाले की , भारत हा कृषीप्रधान देश आहे . परंतु सध्या येथील शेती व शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे . त्यांनी विविध फळबागांबद्दल मार्गदर्शन केले . त्याचबरोबर जैविक शेतीचे महत्त्व सांगितले . रासायनिक खतांचा ऱ्हास हा थांबवला गेला पाहिजे . शेतकरी व जनता बळी पडत आहे . त्याचबरोबर येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले . यावेळी उपस्थित सरपंच , ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते , कृषिदूत स्वप्निल गायकवाड , प्रज्वल जाधव , प्रमोद पागीरे , यश आहेर , करण गोरे , राय चिते यांच्यासह सह्याद्री कृषी परिवाराचे विद्यार्थी उपस्थित होते .











