खेड शहरामधील ५०० ग्राहक अंधारात, पुरवठा खंडित 

खेड(प्रतिनिधी)

खेड शहरातील तांबे मोहल्ला आणि सफा मज्जिद चौक या ठिकाणी पुराचे पाणी ट्रान्सफॉर्मर च्या डिस्ट्री बूशन बॉक्स ला लागत असल्यामुळे, सुरक्षिततेच्या कारणास्तव ह्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

११ के.व्ही. खेड फिडर वरील एकूण शहरातील थोडा भाग, ०२ ट्रान्सफॉर्मर व सुमारे ५०० ग्राहकांना वीज पुरवठा बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत ची माहिती अधीक्षक अभियंता, महावितरण, रत्नागिरी यांनी माध्यमांना दिली