देवगड तहसीलदार यांनी कट्टा येथील नुकसानीची केली पाहणी तालुक्यात ४० मीमी पावसाची नोंद
देवगड(प्रतिनिधी)
देवगड तालुक्यात शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात ४० मिमी पावसाची आहे. तालुक्यात पावसाचा आता कहर झाला आहे. मिठबाव येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून विद्युत वाहिनीवर कोसळल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्याने वीस पुरवठा खंडित झाला तसेच दहिबाव मिठबाव हा मार्ग देखील बंद होता. विद्युत पुरवठा रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत खंडित झाला होता.
देवगड तालुक्यात मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन सुमारे ४ लाख ५० हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले आहे.यामध्ये सर्वाधिक नुकसान देवगड कट्टा येथे झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची देवगड तहसीलदार यांनी पाहणी केली. तालुक्यातील देवगड कट्टा येथील महेश शंकर बाबर यांच्या राहत्या घरावर कलम कोसळून सुमारे तीन लाख 78 हजार रुपयांचे तर तेथीलच प्रशांत परशुराम दरवेश यांच्या घराची पडवी पडवीची भिंत कोसळून तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे चांदोशी येथील मनोहर धोंडू चांदोसकर यांच्या घरावर कलम कोसळून सुमारे 50000 तर टेंबवली नाईकवाडी येथील फरीदा अख्तर नाईक यांच्या घराच्या छपराचे 2500 चे नुकसान झाले आहे असे एकूण मिळून तालुक्यात चार लाख 60 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे .
शनिवारी रात्री दहा वाजता मिडबाव मार्गावरील वडाच्या झाडाच्या मोठ्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच दहिबाव मिठबाव मार्ग देखील बंद झाला होता.
किंजवडे बाईटवाडी येथील दोन महिन्यापूर्वी बनविलेला रस्ता या मुसळधार अतिवृष्टीत वाहून गेला आहे. किंजवडे बाईतवाडी हा रस्ता व्हावा यासाठी गेली कित्येक वर्ष मागणी होती मात्र यावर्षी रस्त्याचे काम पूर्ण झालं आणि पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे.शासनाने अजूनही काही अतिवृष्टीच्या इशारा दिलेलाच आहे.