भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने हिवाळे येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत व फ्रिज भेट

अमित खोत | मालवण : हिवाळे गावात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने दुकान, घरे यात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. या कुटुंबियांना भाजपा नेते निलेश राणे यांनी आर्थिक मदत तसेच ज्यांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले त्या तीन कुटुंबियांना फ्रिज देऊन मदत करण्यात आली.

हिवाळे ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकसानग्रस्त यांना मदत प्रदान करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजु परुळेकर, सरपंच रघुनाथ धुरी, संतोष गांवकर, माजी सरपंच विश्वास परब, नयन कुलकर्णी, भाई पवार, पांडुरंग धुरी, विश्वनाथ परब, अरुण परब, संपद गावडे, राजेंद्र परब, भाई घाडीगावकर, बाबा परब यांसह ग्रामसेवक सुनील मळगावकर, ग्राप सदस्य सानिका सावंत, कर्मचारी निलेश पवार, नूतन परब यांसह अन्य उपस्थित होते.

घरात आणि दुकानात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अरुण धुरी, अभि चव्हाण, राजेंद्र हिवाळेकर यांना फ्रिज भेट देण्यात आली. तर सतीश चव्हाण, रमेश राठोड, शत्रुघ्न पवार, या नुकसानग्रस्त कुटुंबाना रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.

हिवाळे येथील नुकसानीची माहिती निलेश राणे यांना मिळताच त्यांनी ग्रामस्थांना तात्काळ मदत पाठवून दिली. विकासकामे असो अथवा मदतकार्य प्रत्येक वेळी त्यांचे सहकार्य मिळत असते. असे महेंद्र चव्हाण यांनी सांगत निलेश राणे यांचे आभार मानले.