मोबाईलवर स्टेटस ठेऊन आत्महत्या करत असल्याची दिली माहिती
रत्नागिरी । प्रतिनिधी :मूळचे राजापुरचे असलेले आणि रत्नागिरीत वकिली व्यवसाय करणारे ॲड. सौरभ सोहोनी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी शहरातील खडपे वठार येथील किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडला.
रत्नागिरीतील तरुण वकील सौरभ सोहनी (32,मुळ रा.राजापूर सध्या रा. थिबा पॅलेस,रत्नागिरी) यांनी मोबाईल वर स्टेटस ठेऊन काल रात्री भाटे पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या स्टेटस वरून निष्पन्न झाले. सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत असताना सौरभ हा मोटरसायकलने भाटे पुलावर आले व तेथून त्यांनी समुद्रात उडी मारली. आज सकाळी त्याचा मृतदेह खडपे वठारभागात आढळून आला. काल रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान ने ॲड. सौरभ सोहनी याने आपल्या मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो म्हणून सांगून बाहेर पडले. त्याच दरम्यान सौरभ यांनी मोबाईलला “माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूम मेट ची, मी रहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नये ही विनंती…!! क्षमस्व” हा स्टेटस ठेवला होता. त्यांच्या मित्राची हा स्टेटस वाचल्यानंतर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तत्काळ मोबाईल लोकेशन तपासले. तेव्हा ते जिल्हा न्यायालयाच्या जवळपास लोकेशन दाखवत होते. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता भाट्ये पुलावर त्यांना मोटरसायकल मिळाली.
परंतु समुद्राला असलेले पाणी, प्रचंड अंधार आणि पाऊस यामुळे सौरभच्या नीट शोध घेता येत नव्हता. त्यात दुर्दैवाने आज सकाळी खडपे वठार समुद्रकिनारी सौरभ सोहनी यांचा मृतदेह आढळून आला. सौरभ हा मनमिळावू स्वभावाचा होते. त्याचा मित्र वर्ग मोठा होता. सौरभने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे.
मूळचा राजापूर चा असलेले ॲड. सौरभ सोहनी ली सात ते आठ वर्षांपासून रत्नागिरीत वकिली करत होता. रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथे मित्रा बरोबर भाड्याने रहात होता. सौरभ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पुण्यामध्ये वकील असलेले त्याचे भाऊ आज सकाळी रत्नागिरी मध्ये हजर झाले. कायदेशिर सोपस्कार पूर्ण झाल्यावर सौरभ मृतदेह भावाच्या ताब्यात देण्यात आला.











