रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवले. जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ही जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.
देव कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील मृदुला मंगेश सनगरे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तिला कास्यपदक प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याबद्दल भारत शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी व अन्य पदाधिकारी व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी अभिनंदन केले.