पुर्णगड, गावखडी पुलाच्या संरक्षक भिंत धोकादायक

 

गावखडी/वार्ताहर : रत्नागिरीत तालुक्यातील पुर्णगड गावखडी सागरी महामार्गाच्या संरक्षक भिंतीचा काठडा मोडून धोकादायक बनला असून तो त्वरित सुरळित करून मिळण्याची मागणी
राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष श्री संतोष पोकडे यांनी केले आहे

 

 

तसेच या मार्गावरील वाहतूक जीवघेणी झाली असून या पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे
या पुलाचा स्लॅब अधून मधून खचला असून त्यातून लोखंडी शिगा काही प्रमाणात बाहेर पडल्या आहेत
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे पावसाळ्यात पुलाची अवस्था अधिकच गंभीर झाली
या पंधरा दिवसांत त्वरित सुधारणा न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संतोष पोकडे यांनी दिला आहे