अ‍ॅड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात बाह्य परिक्षांबद्दल मार्गदर्शन

 

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अ‍ॅड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना जे.ई.ई मेन,अ‍ॅडव्हान्स ,नीट,सी.ई.टी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.बहिस्थ परीक्षा देताना कोणत्या गोष्टी लक्ष्यात घ्यायला हव्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

यावेळी प्रा.नागेश हेमबाडे यांनी बहिस्थ परीक्षांचा अभ्यास करताना पाठांतरपेक्षा ,आकलन,समज,उपयोजन या गोष्टींना किती महत्व आहे .हे पटवून दिले.१२ वि सायन्स नन्तर विविध क्षेत्र निवडताना कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी प्रा माणिक बचाटे, व्यंकटेश भालेकर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत गौरव पोंक्षे यांनी केले तर आभार ओंकार मुळ्ये यांनी मानले.