शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रमोद गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन

रत्नागिरी | प्रतिनिधी
शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रमोद शामराव गायकवाड यांचे दीर्घ आजाराने सोमवार 22 जुलै रोजी त्यांच्या गावी निधन झाले. काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली होती. त्यानंतर ते आजारातून सावरत असतानाच सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. गेली 28 वर्षे ते पोलिस खात्यात नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात भाउ, पत्नी असा परिवार आहे.