मंगला एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान तरुणाचा 10 हजार रुपयांचा मोबाईल गेला चोरीस

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाचा 10 हजार रुपयांचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सोमवार 22 जुलै रोजी रात्री 12.55 वा.मंगला एक्सप्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.
याबाबत नुबीन अशोक सुंदरन (29, रा. मल्लपुरम,केरळ) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी तो मंगला एक्सप्रेसने हजरत निजामुद्दीन दिल्ली ते थिवीम असा प्रवास करत होता.रात्री 12.55 वा. सुमारास ही रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबली असता ते बाथरुमला गेलेला असाताना या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.