कळंबट येथील नमन कलावंत महादेव कोकमकर यांचे निधन 

 

 

चिपळूण (वार्ताहर ): तालुक्यातील कळंबट गावचे सुपुत्र आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूणचे पदाधिकारी आणि पत्रकार निलेश कोकमकर यांचे वडील महादेव सखाराम कोकमकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे कळंबट गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

महादेव कोकमकर हे मुंबईत असताना रंगकाम करून आपला परिवार त्यांनी संभाळला होता. अतिशय हलकीच्या परिस्थितीत त्यांनी परिवाराचे पालन पोषण केले त्यांनी नमन कला जोपासली होती. नमन हा त्यांचा आवडीचा छंद होता. कामानिमित्त मुंबई गोवा या ठिकाणी असले तरी महादेव कोकमकर नमनासाठी आवर्जून उपस्थित राहायचे. मृदुंग वाजविण्यात ते पटाईत होते. अनेक वर्ष कळंबट येथील श्री सोमेश्वर नमन मंडळात मृदंगमणी म्हणून त्यांची छाप होती. महादेव कोकमकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , तीन मुली, सूना,जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे उत्तर कार्य ३१ जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण मुंबई व ग्रामीण आणि कुणबी युवा चिपळूण यांनी शोक व्यक्त केला आहे.