चिपळुणात २७ रोजी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

 

 

चिपळूण (वार्ताहर ): महाराष्ट्र राज्य शासनाच्या अमृत स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील स्वयंरोजगार अथवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात होणार आहे.

 

खुल्या प्रवर्गातील 18 ते 55 वर्षे वयोगटातील ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे किंवा व्यवसाय करीत आहेत . ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या पेक्षा कमी आहे आणि ज्यांना भांडवलाची आवश्यकता आहे. अशा खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो . या कर्जासाठी बँकेला जे व्याज भरावे लागते ते व्याज अमृत योजनेनुसार लाभार्थींना अमृत संस्थेकडून परत मिळेल. या मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या खुल्या प्रवर्गातील इच्छुकांनी येथे वेळी पासपोर्ट फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स, तहसीलदार यांचा आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे दाखला, रहिवासी दाखला, माहिती लिहून घेण्यासाठी कागद व पेन या गोष्टी घेऊन याव्यात. खुल्या प्रवर्गातील स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व करीत असलेल्या इच्छुकांनी या मार्गदर्शन मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण अध्यक्ष अविनाश पोंक्षे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.