धाकोरा येथे कृषीमित्रांनी सांगितली ‘विविध कलम पद्धती ‘

 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :                               उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शना साठी आलेल्या कृषिमित्रांनकडून “आंब्याचे कोय कलम, काजूचे शेंडा कलम व पेरूचे गुटी कलम ” प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली’ ने निर्माण केलेले “कोय कलम” व इतर कलमे कशी बांधावी याची माहिती दिली. ही कार्यशाळा परिवर्तन महिला शेतकरी संघ धाकोरा येथे पार पडली.

या सोबतच सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे सर यांनी शेती शाळा आयोजित करून “जैविक कीड नियंत्रण प्रक्रिया ” याची माहिती गावातील महिला बचत गटाला दिली.

सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी कलम कसे बांधावे त्याचे महत्व व फायदे, त्यासोबतच त्याला येणारा खर्च व मिळणारा नफा, तसेच याद्यारे सुरू करता येणारा रोजगर या बद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

ह्या कार्यक्रमास महिला शेतकर्‍यांनी चांगला सहभाग नोंदवला व स्वतः कलम प्रत्यक्ष बांधुन दाखवले. तसेच तालुका कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे सर यांनी “जैविक कीड नियंत्रण प्रक्रिया ” याबद्दल सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले .

बचत गटातील महिला व गव्हाणे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर गटामध्ये प्रियश राघोबा धुरी, मल्हार संदिप महाजन, हर्षल अरुण पाटील, श्रेयस जयंत गायकवाड, ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर, सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.