सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी सूर्यकांत मोतीराम नेवगी यांचे बुधवारी रात्री दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश नेवगी यांचे ते वडील तर माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, पुतणे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.












