उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका अजित पवार राष्ट्रवादी तर्फे मुलांना खाऊ वाटप..

 

वेंगुर्ले | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका अजित पवार राष्ट्रवादी तर्फे मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

वेंगुर्ले शाळा नंबर ४ मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब, त्याच प्रमाणे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सुशील चमणकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर उपाध्यक्ष स्वप्नील परब आदी उपस्थित होते.