माणगाव l प्रतिनिधी : माणगाव – ढोलकरवाडी येथे समोरून येणाऱ्या एसटीला साईड देताना मालवाहू ट्रक गटारात कलंडून अपघातग्रस्त झाला. सदर ट्रक अहमदनगर येथून माणगाव बाजारपेठेत कोंबडी खाद्य घेऊन जात होता. मेडीकल नजीक समोरून येणाऱ्या एसटीला साईड देताना ट्रक चालकाचा ताबा सुटला व ट्रक गटारात कलंडला.












