माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदी दीपक कृष्णाजी पोंक्षे यांची निवड करण्यात आली.फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ते निवडन आले होते.विद्यमान सचिव सुभाष सहस्त्रबुद्धे यांनी राजीनामा दिल्याने श्री दीपक पोंक्षे यांची निवड करण्यात आली.यापूर्वीही संस्थेच्या सचिवपदी काम केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्यात त्यांची विशेष रुची आहे.नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत त्यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीप्रसंगी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बापट,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सुभाष सहस्त्रबुद्धे,मनोज शिंदे,आनंद साठे,संजय सहस्त्रबुद्धे,हनिफ म्हाते,राजेश फणसे,दीपक शिगवण आदी उपस्थित होते.दीपक पोंक्षे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे












