शिवसेना नेते आमदार रवींद्र फाटक यांचे चिपळूणमधील बैठकीत आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेना नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक व आ. रवींद्र फाटक यांनी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीत केले.
नुकतेच शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी चिपळूण-बहादूरशेखनाका येथील पुष्कर सभागृहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी गुहागर विधानसभा क्षेत्रातील खेड व चिपळूण तालुक्यामधील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सुरुवातीला शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक यांचे स्वागत केले. यानंतर आ. फाटक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज रहावे. महायुती सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. जी विकासकामे महायुती सरकारनेच मंजूर केली आहेत. ती लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन करतांना आगामी विधानसभा निवडणुकीत सज्ज राहण्याचे आ. फाटक यांनी यावेळी आवाहन केले.
शिवसेना सचिव व गुहागर विधानसभेचे निरीक्षक सुशांत शेलार, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड-गुहागर विधानसभा तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, शरद शिगवण, चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ, लोटे विभागप्रमुख योगेश आंब्रे, धामणंद विभागप्रमुख सखाराम पालांडे, युवा सेना शहर प्रमुख विनोद पिल्ले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेविका सौ. रश्मी गोखले, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. सुप्रिया सुर्वे, शहर प्रमुख सौ. प्राजक्ता टकले, युवती शहरप्रमुख शिवानी शिंदे, सौ. सुकन्या चव्हाण सर्व प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










