बांदा श्री पाटेश्वर मंदिराचा आज वर्धापन दिन सोहळा

 

 

बांदा l प्रतिनिधी :   बांदा पोलीस स्टेशन आवारातील श्री देव पाटेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आज रविवार २८ जुलै रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता लघुरुद्र, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व त्यानंतर महाप्रसाद होईल. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास बडवे व कर्मचारी वर्गाकडून करण्यात आले आहे.