ओटवणे(प्रतिनीधी) कै राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जयंतीच्या औचीत्यावर अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी राजन आंगणे मित्रमंडळाचे माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, उद्योजक अतुल पेंढारकर, बंटी पुरोहित यांचे सहकार्य लाभले.
उद्योजक कै राजन आंगणे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कला व क्रिडा उपक्रमांसह गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सढळहस्ते मदत करीत असत.त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला उजाळा देण्यासाठी कै राजन आंगणे मित्रमंडळ नेहमीच पुढे असते यांच्या जयंतीचे औचित्य साधुन नेहमीच सहकार्य करत असतात.सिंधु मिञ प्रप्रिष्ठान सुद्धा नेहमीच अशा उपक्रात सहकार्य करत असून त्यांच्या वतीनेच अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी या सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्याकडे छत्र्या सुपूर्त कऱण्यात आल्या. या छत्र्यांचे वाटप रोणापाल येथील दयासागर छात्रालय, ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिर आणि सावंतवाडी येथील वि .स. खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या.

यावेळी सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे, सचिव भार्गवराम शिरोडकर, दीपक गावकर, सह त्या त्या विद्यायचे शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.रोणापाल दयासागर छात्रालयाचे जीवबा वीर, मंगल कामत, रवळनाथ विद्यामंदिरच्या संजीवनी गवस मॅडम, एकनाथ धोंगडे सर ,पी एम कांबळेसर एन व्ही राऊळ सर, शिक्षकेतर कर्मचारी शंकर बिरोडकर, मंगेश गावकर शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत, तर वि स खांडेकर सावंतवाडी विद्यालयाचे
मुख्याध्यापक श्री. पवार, श्री. परिट, श्री. कोळी, श्री. धुमाळे, श्रीम. घोगरे सौ. शृंगारे, सौ. इन्सुलकर
शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. शाळेच्या वतीने कै. राजन आंगणे मित्रमंडळ आणि सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठान चे आभार मानण्यात आले.











