एमआयडीसी मिरजोळे येथे क्रेनची दुचाकीला धडक

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : बेदरकारपणे क्रेन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी क्रेन चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 26 जुलै रोजी सायंकाळी 7.50 वा. एमआयडीसी मिरजोळे येथील प्लॉट नं ई-5/6 समोर घडली.

 

 

निलेश कुमार शिवनाथ (रा.एमआयडीसी मिरजोळे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या क्रेन चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनसार, शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एवाय-4698) मिरजोळे एमआयडीसी येथील जिमकॉम कंपनीकडे तोंड करुन रस्त्याच्या बाजुला उभा होता. त्यावेळी समोरुन येणारी क्रेन (एमएच-14-एझेड-8286) वरील चालकाने हयगयीने क्रेन चालवून समोरुन फिर्यादीच्या दचाकीला धडक देत हा अपघात केला. याप्रकरणी क्रेन चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.