निलेशजी एक मुलगा म्हणून त्यावेळी तुमचा अभिमानच वाटला!

 

 

मालवण येथे ज्येष्ठ नागरिक यांनी भेट घेऊन निलेश राणे यांचे केले कौतुक 

अमित खोत | मालवण : विरोधकांना आपल्या आक्रमक शैलीने घायाळ करणारे भाजप नेते निलेश राणे नेहमीच कार्यकर्त्यांसाठी हळव्या मनाचे आहेत. या बरोबरच आई वडिलांवर जीवापाड प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व वडिलांवर कोणतीही टीका सहन करत नाही. जश्यास तसे प्रत्तूत्तर किंबहुना आक्रमक बाणा निलेश राणे यांचा दिसून येतो. विरोधकांना घायाळ करणारे गुहागर येथील निलेश राणे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. त्या भाषणाला अनेक दिवस उलटले असतील. मात्र त्याच भाषणाचा धागा पकडून मालवण येथील जेष्ठ नागरिक यांनी निलेश राणे यांची भेट घेऊन विशेष कौतुक केले. वडिलांच्या टिकेला जशास तसें उत्तर देण्याच्या तुमच्या शैलीचा अभिमानच वाटला. एक मुलगा म्हणून त्यावेळी तुमची भुमिका योग्यच होती अश्या भावाना जेष्ठ नागरिक यांनी व्यक्त केल्या.

 

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर कणकवलीत टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ना. नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र भाजपा नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांच्या गुहागरात जाहीर सभा घेऊन आक्रमक शैलीत उत्तर दिले. या सभेतील निलेश राणे यांच्या भाषाशैली वरून काही राजकीय विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती. या घटनेला काही महिन्यांचा कालावधी लोटला.

 

दरम्यान, रविवारी मालवण भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमासाठी निलेश राणे आले असता. नागरिकांच्या भेटी घेत असताना बीएसएनएल मधून सेवानिवृत्त झालेल्या महेश परब या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने निलेश राणे यांच्याशी संवाद साधताना गुहागर मधील “त्या” भाषणाची आठवण काढली. निलेशजी एक मुलगा म्हणून तुम्ही त्यावेळी घेतलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद होती. एक मुलगा म्हणून तुमच्या भूमिकेचा मला आदरच वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.