खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्याजवळ
रेल्वेगाड्या आता ताशी ३० कि.मी. वेगाने धावू लागलीं असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे
काही दिवसांपूर्वी रुळावर मातीचा भराव भराव येऊन वाहतूक ठप्प झाली होती. तेव्हापासून येथून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली होती. सुरुवातीचे दोन दिवस ताशी १० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा अपवाद वगळता त्यानंतर ताशी २० कि.मी.च्या वेगाने रेल्वेगाड्या मार्गस्थ होत होत्या.
या वेगात आणखी ताशी १० कि.मी.ची वाढ करण्यात आली असून आता ३० कि. मी. वेगाने रेल्वेगाड्या धावत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.











