
आमदार नितेश राणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या सूचना
अडथळा दुर झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी रेल्वे स्टेशन समोरील वाहनचालक व प्रवाशांना अडथळा ठरणारे सर्कल आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाने हटवले आहे. त्यामुळे आता या वैभववाडी स्टेशनने मोकळा श्वास घेतला आहे. या सर्कलमुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सर्कल असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. अडथळा ठरणारे सर्कल काढून टाकण्यात यावे याबाबत प्रवासी व रिक्षा संघटनेने आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.
चार दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर आमदार नितेश राणे यांनी स्वतः भेट देत पाहणी केली होती. यावेळी विविध विषय व प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार नितेश राणे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. स्टेशन समोरील सर्कल तात्काळ हटवा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दोन दिवसात सदर सर्कल काढून टाकण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सदर सर्कल हटविण्यात आले आहे. अडथळा ठरणारे सर्कल हटवल्यामुळे वाहन चालक व प्रवाशात समाधान व्यक्त होत आहे.











