वैभववाडी | प्रतिनिधी : सांगुळवाडी येथील अंबरनाथ महाराज मठ याठिकाणी सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वा. अभिषेक, दुपारी ०१.०० वा महाआरती, दुपारी महाप्रसाद तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










