आ. नितेश राणे यांच्या सुचना : ते सर्कल अखेर हटविले
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या प्रयत्नांना यश
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी रेल्वे स्टेशन समोरील वाहनतळावरील अडथळा ठरणारे सर्कल (चौक) बुधवारी सकाळी हटविण्यात आले आहे. त्यामुळे या वाहनतळाने आता मोकळा श्वास घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाने हे सर्कल हटवले आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्या व प्रलंबित प्रश्न याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. या समस्यांबाबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पुढाकार घेत आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान २७ जुलै रोजी आ. नितेश राणे यांनी रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. यावेळी कोकण रेल्वेचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी, रिक्षा संघटनां पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी उपस्थित होते.
वाहन चालकांना अडथळा ठरणारा वाहनताळावरील सर्कल, चौक हटविण्यात यावे, रेल्वे ट्रॅक वरील ब्रीज लवकर बांधण्यात यावा, आरक्षण सुविधा तात्काळ चालू करण्यात यावी, प्लॅटफॉर्म वरती पत्राशेड घालण्यात यावा, प्लॅटफॉर्म वरती बैठक व्यवस्था व शौचालय बांधण्यात यावे अशा विविध मागण्या प्रमोद रावराणे यांनी मांडल्या होत्या.
या मागण्यांच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशन समोरील सर्कल हटविण्यात आले आहे. वाहनतळावरील झाडी – झुडपांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. एक एक प्रश्न मार्गी लागत असल्याने सर्वांमधून समाधान व्यक्त होत आहे.












