राजापुरातील डॉ. अभय अवळणी यांना पितृशोक

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील समर्थ नगर (भटाळी) येथील प्रतिष्ठीत नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद हरी अळवणी (९२) यांचे मंगळवारी ३० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शहरातील प्रसिध्द दंतचिकित्सक डॉ. अभय अळवणी यांचे ते वडील होत.

 

 

गोविंद अळवणी यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र मंगळवारी अचानक त्यांना अवस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली.
प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी तालुक्यात अनेक शाळांमध्ये काम केले. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते. मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, अभय व संजय असे दोन मुलगे, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंतसंस्कार करण्यात आले.