युवकांनी संधीचा लाभ घ्यावा: तहसीलदार सूर्यकांत पाटील यांचे आवाहन
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तहसील कार्यालय येथे महसूल पंधरवडा निमित्ताने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत कार्य प्रशिक्षणामध्ये भाग घेण्याकरिता उमेदवारांचे नोंदणी कॅम्पचे आयोजन शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यत करण्यांत आलेले आहे. अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे.
सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय निम शासकीय कार्यालये, महामंडळ अशा प्रत्येक कार्यालयात किमान 01 उमेदवार व कमाल मंजूर पदांच्या 5% उमेदवार या योजनेंतर्गत भरले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, कौशल्य विकास कार्यालय, सर्व नगरपालिका/नगरपंचायत, विद्युत वितरण MSEB, जिल्हापरिषद अंतर्गत सर्व कार्यालये व पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय, कृषी विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभाग, भुमी अभिलेख, आरोग्य विभाग, शासकीय मेडीकल कॉलेज, जिल्हा उद्योग केंद्र यासारखे जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे यांचेकडील रिक्तपदे भरण्यांत येणार आहेत. आज रोजी 560 रिक्तपदे पोर्टलवर अधिसूचित केली आहेत. यात Clerk, Data Entry Operator, Electrician, Wireman, Driver, Engineer, Agriculture Related, Nurse, Peon, Security Guard, Warden, Animal Husbandary Related, Accountant, Plumber, Fitter, Mechanic, Turner, Sweeper, Barber, Tailor यासारख्या विविध पदांचा समावेश आहे. त्याकरिता बारावी, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे.
12 वी पास उमेदवारांना दरमाह रु. 6000/-, आयटीआय पास रु. 8000/- व पदवी व पदव्युत्तर पास रु.10000/- विद्यावेतन सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत.
उमेदवारांना सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टैलवरील नोदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या नोंदणीकरीता प्रत्येक तहसिल कार्यालय स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यांत आले असून सदर कॅम्पमध्ये उमेदवारांची निशुल्क नोंदणी करून देण्यांत येणार आहे. नोंदणीकरीता शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी आधार कार्ड, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीसह आपल्या तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे. ज्यांची ऑनलाईन वरील पोर्टलवर नोदणी झालेली आहे अशा उमेदवारांना ऑनलाईन संबंधित पदांकरिता Apply करून दिले जाईल.
जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र युवक युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा या कॅम्पमध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मा. श्री. किशोर तावडे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228835, मोबाईल नंबर 9403350689 किंवा प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क करावा.










