आजाराला कंटाळून राहत्या घरी फिनेल प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान मृत्यू

dead

 

 

रत्नागिरी | प्रतिनिधी
आजाराला कंटाळून राहत्या घरी फिनेल प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार 31 जुलै रोजी दुपारी 2.45 वा.जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.

अमोल अनंत कांबळे (44,रा.बौध्दवाडी कोतवडे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. अमोल कांबळे हे मधुमेह आणि प्यानक्रिया आजाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी राहत्या घरी फिनेल प्राशन केले होते. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना सायंकाळी 6.13 वा. त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.