कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा

खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा, अशी मागणी रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना केली. यामुळे प्रवाशांचा आवाज केंद्र शासनापर्यंत पोहचवण्यासाठी खासदार तटकरे यांनी आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे.
कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ही एक स्वायत्त संस्था आहे. कोकण मार्गाचे बांधकाम करण्याच्या हेतूने स्थापना झाली. २५वर्षे लोटूनही हस्तांतर न
झाल्याने कोकण मार्गाच्या विकासावर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वेचे महामंडळ पूर्ण क्षमतेने विकास करण्याचा प्रयत्न करत असले तरी निधीअभावी मर्यादाच येत आहेत. याशिवाय २५ वर्षात प्रवासी संख्या कित्येक पटीने वाढूनही त्या प्रमाणात गाड्यांसह सुविधांची वाढही झालेली नाही. या सुविधा वाढवण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे गरजेचे असताना निधी मिळत नसल्याने यात खोडा पडला आहे.