पोयनार मध्ये गावठी हातभट्टी दारुधंद्यावर धाड!

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील पोयनार-बौध्दवाडी येथील एका गावठी हातभट्टी दारु धंद्यावर येथील पोलीसांनी धाड टाकून ३,हजार ५५ – रुपये किंमतीची गावठी हातभट्टी ची दारू जप्त केली. हि कारवाई द२९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आली या प्रकरणी एकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
   सुजीत सिताराम मोगरे (वय-४५ , रा. पोयनार – , ता. खेड)  असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे  गैरकायदा विनापरवाना ३ हजार ,५५० रूपये  किंमतीचा निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा ३५ लीटर    गावठी हातभट्टीची दारु आढळून आली  या प्रकरणी  महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे