मंडणगड | प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड मध्ये ,आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलन करून टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच उपमुख्याध्यापक श्री.अर्जुन हुल्लोळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर यांनीही दीपप्रज्वलन करून पुष्प अर्पण केले .
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये १)कुमारी स्नेहल गीते २)दामिनी पाटील ३)समर्थ लाडगे ४)चिराग मोरे ५)वेद घोसाळकर ६)वंश भारदे ७)शुभ्रा नारकर ८) ईश्वरी गीते ९)शिवकन्या शिंदे १०)स्वरा मळेकर ११)पुनम साळुंखे १२)इंशा फरास १३) साक्षी खैरे १४)आदिती खैरे १५) आशुतोष माळी व
१६) रोहिणी पाटील या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्याविषयी आपले मत मांडले. काही विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर सुंदर अशा कविता सादर केल्या.
विद्यालयातील शिक्षक श्री.किशोर कासारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .विजय खाडे ,उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी व पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर ,सौ शकुंतला वाघमारे, सौ. ज्योती राणे व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी श्री. शैलेश खताते यांनी शालेय सांस्कृतिक विभागाच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











