वाफोली एबी स्विच ला अज्ञाताकडून टाळे

वाफोली सह ओटवणे दशक्रोशी अंधारात.

ओटवणे (प्रतिनिधी ) आधीच विजेच्या समस्येने त्रस्त वाफोली सह ओटवणे दशक्रोशीला वीज वितरण ला जाब विचारल्यानंतर अधिकाऱ्यांना धारेवार धर ल्यानंतर थोडाफार का होईना दिलासा मिळाला होता.

 

 

मात्र एका अज्ञात व्यक्तीच्या चुकीमुळे एक रात्र अंधारात रहावे लागले.या व्यक्तीने वीज वितरण कंपनीवर रोष आणि संताप व्यक्त करण्यासाठी केल असेल ही पण या व्यक्तीला इतर गावांना अंधारात ठेवण्याचा काय अधिकार असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप पर्यंत हे लॉक वीज वितरण कढून खोलण्यात न आल्याने वाफोली चा काही भाग,विलवडे,ओटवणे,सरमळे,सह पंच क्रोशी,काळोखात राहिली. एका व्यक्तीच्या चुकीमुळे मुर्खपणा मुळे ग्रामस्थाना याचा त्रास सोसावा लागल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे तर या अज्ञात व्यक्ती विरोधात महावितरण कारवाई करणार आहे.