भोगलेवाडी तिठा ते बौद्ध वाडी रस्ता साइडपट्टी खचल्याने धोका!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : भोगलेवाडी तिठा ते बौद्धवाडी येथील रस्ता साइडपट्टी अतिवृष्टी मुळे खचत असून या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. सदर रस्ता हा माळगाव बाळोजीचीवाडी व बिळवस सातेरी जलमंदिराला जोडलेला आहे. सदर रस्त्याने कायम वाहतूक चालू असते व शाळेतील मुलाना सुद्धा हाच रस्ता सोईचा आहे. सदर बौद्धवाडी येथील रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सूर्यकांत कृष्णाजी रावराणे,
सामाजिक कार्यकर्ते समीर पेडणेकर यानी केली आहे