राजापूर एसटी आगाराचे वतीने ‘एसटी संगे मार्लेश्वर कुणकेश्वर दर्शन यात्रेचे आयोजन

 

राजापूर (वार्ताहर): श्रावण महिन्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजापूर आगाराचे वतीने एसटी संगे मार्लेश्वर व कुणकेश्वर विशेष दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी दि. ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट व २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी जाईल. राजापूर ते मार्लेश्वर ही यात्रा राजापूर – वाटूळ – भांबेड मार्गे मार्लेश्वर, बावनदी मार्गे निवळी – गणपतीपुळे मंदिर, आरेवारे मार्गे – पावस श्री स्वामी स्वरूपानंद मठ दर्शन, आडिवरे श्री महाकाली मंदिर दर्शन – राजापूर असा प्रवासाचा मार्ग राहणार आहे.

तर कुणकेश्वर दर्शन यात्रेसाठी राजापूर कात्रादेवी वाडी- कुणकेश्वर मंदिर कोंडामा प्रतिबाळूमामा मंदिर, खारेपाटण श्री अधिष्टी देवी मंदिर आणि श्री कालभैरव मंदिर राजापूर असा प्रवासाचा मार्ग असणार आहे.

मार्लेश्वर यात्रेसाठी फुलः ३०५ रुपये तर हाफ १५५ रुपये तीकीट आकारले जाणार आहे. या यात्रेसाठी सकाळी ६.१५ वाजता जवाहर चौक येथून गाडी सुटेल सायंकाळी १७.३० वाजता राजापूरला परत येईल.

तर कुणकेश्वर यात्रेसाठी फुलः ३७५ रुपये, हाफ १९० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. यासाठी सकाळी ६.१५ वाजता जवाहर चौक येथून गाडी सुटेल सायंकाळी १९.०० वाजता राजापूरला परत येईल. या योजनेकरिता महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत व ७५ वर्षावरील नागरिकांना १०० टक्के सवलतीचा लाभ दिला जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक राहुल मलूष्टे यांनी केले आहे. नाव नोंदणी व अधीक माहितीसाठी स्थानक प्रमुख सचिन मोरे : ९४०४३३१९७९ अनिल कुवेसकर :९४२११४३५५८ यांच्याशी संपर्क साधवा असे कळविण्यात आले आहे.