होडावडा गावातील अंगणवाडी व मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप…

 

 

मनीष दळवी वाढदिवसा निमित्त भाजपा ग्रामकमिटी व मित्रपरिवारातर्फे आयोजन..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :होडावडा गावचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होडावडा गावातील अंगणवाडी व मराठी शाळांमध्ये भाजपा ग्राम कमिटी होडावडा व मित्रपरिवार यांचे वतीने शैक्षणिक साहित्य व मुलांना खाऊ वाटप केले तसेच या निमित्ताने शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सोसायटी चे सचिव राजबा सावंत उपसरपंच, अनन्या धावडे, मनीषा जाधव, शैलजा साळगावकर ग्रामपंचायत सदस्य, प्रसाद परब तालुका कार्यकारिणी सदस्य, विवेक साळगावकर, विशेष कार्यकारी अधिकारी, बूथ अध्यक्ष, राजेश करगुटकर भाजपा युवामोर्चा अध्यक्ष, दिगंबर दळवी, विजय होडावडेकर, सोसायटी सदस्य, मनोहर नाईक ग्राम कमिटी अध्यक्ष, किरण नाईक, राजाराम पावनोजी, विनोद दळवी आदी भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.